महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC RECRUITMENT 2019

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC RECRUITMENT 2019 



महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- ८६५ जागा 


पदांचे विवरण :- 

१) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) :- ३५ जागा 

२) कनिष्ठ अभियंता ( विद्युत व यांत्रिकी ) :- ०९ जागा 

३) लघुलेखक :- २० जागा 

४) वरिष्ठ लेखापाल :- ०४ जागा 

५) सहाय्यक :- ३१ जागा 

६) लिपिक टंकलेखक :- २११ जागा 

७) भूमापक :- २९ जागा 

८) वाहनचालक :- २९ जागा 

९) तांत्रिक सहाय्यक :- ३४ जागा 

१०) जोडारी :- ४१ जागा 

११) पंपचालक :- ७९ जागा 

१२) वीजतंत्री :- ०९ जागा 

१३) शिपाई :- ५६ जागा 

१४) मदतनीस :- २७८ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) :- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका 

२) कनिष्ठ अभियंता ( विद्युत व यांत्रिकी ) :- विद्युत किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका 

३) लघुलेखक :- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच राज्य शासन मराठी लघुटंकलेखन ८० श.प्र.मी. व मराठी आणि इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक  किंवा राज्य शासन इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी. व मराठी आणि इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

४) वरिष्ठ लेखापाल :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी  

५) सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच सेवेत दाखल झाल्यास २ वर्षाच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक 

६) लिपिक टंकलेखक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी ३० श.प्र.मी व इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणेआवश्यक 

७) भूमापक :- भूमापक विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण तसेच AUTOCAD अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक 

८) वाहनचालक :- इयत्ता ७ वि उत्तीर्ण आवश्यक. हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना व २ वर्षाचा अनुभव आवश्यक 

९) तांत्रिक सहाय्यक :- संबंधित विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम उत्तीर्ण 

१०) जोडारी :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जोडी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक 

११) पंपचालक :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक  

१२) वीजतंत्री :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्युत अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक 

१३) शिपाई :- इयत्ता ४ उत्तीर्ण आवश्यक तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक  

१४) मदतनीस :- इयत्ता ४ उत्तीर्ण आवश्यक तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक



वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क:- ७००/- ( मागासवर्गीय :- ५००/- ) ( माजी सैनिकांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ०७ ऑगस्ट २०१९ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.






मराठी सरकारी नोकरी MIDC

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu