महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती | MIDC RECRUITMENT 2019
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ८६५ जागा
पदांचे विवरण :-
१) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) :- ३५ जागा
२) कनिष्ठ अभियंता ( विद्युत व यांत्रिकी ) :- ०९ जागा
३) लघुलेखक :- २० जागा
४) वरिष्ठ लेखापाल :- ०४ जागा
५) सहाय्यक :- ३१ जागा
६) लिपिक टंकलेखक :- २११ जागा
७) भूमापक :- २९ जागा
८) वाहनचालक :- २९ जागा
९) तांत्रिक सहाय्यक :- ३४ जागा
१०) जोडारी :- ४१ जागा
११) पंपचालक :- ७९ जागा
१२) वीजतंत्री :- ०९ जागा
१३) शिपाई :- ५६ जागा
१४) मदतनीस :- २७८ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) :- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
२) कनिष्ठ अभियंता ( विद्युत व यांत्रिकी ) :- विद्युत किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका
३) लघुलेखक :- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच राज्य शासन मराठी लघुटंकलेखन ८० श.प्र.मी. व मराठी आणि इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा राज्य शासन इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी. व मराठी आणि इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
४) वरिष्ठ लेखापाल :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी
५) सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच सेवेत दाखल झाल्यास २ वर्षाच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक
६) लिपिक टंकलेखक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी ३० श.प्र.मी व इंग्रजी ४० श.प्र.मी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणेआवश्यक
७) भूमापक :- भूमापक विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण तसेच AUTOCAD अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक
८) वाहनचालक :- इयत्ता ७ वि उत्तीर्ण आवश्यक. हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना व २ वर्षाचा अनुभव आवश्यक
९) तांत्रिक सहाय्यक :- संबंधित विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम उत्तीर्ण
१०) जोडारी :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जोडी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक
११) पंपचालक :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक
१२) वीजतंत्री :- इयत्ता दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्युत अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक
१३) शिपाई :- इयत्ता ४ उत्तीर्ण आवश्यक तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक
१४) मदतनीस :- इयत्ता ४ उत्तीर्ण आवश्यक तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क:- ७००/- ( मागासवर्गीय :- ५००/- ) ( माजी सैनिकांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- ०७ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मराठी सरकारी नोकरी MIDC

1 टिप्पण्या
Pariksha tarikh hall ticket admit card kadhi e start Honar website user ID password accept Karat nahi profile open Hote nahi
उत्तर द्याहटवा