महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२२ अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२२ । MPSC Technical Service Exam 2022
जागांची संख्या:- ३७८ जागा
पदांचे विवरण:-
अ) महसूल व वन विभाग
१) वनक्षेत्रपाल, (गट ब) :- १३ जागा
आ) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
१) उपसंचालक (कृषी व इतर, गट अ) :- ४९ जागा
२) तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब :- १०० जागा
३) कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर, गट ब:- ६५ जागा
इ) जलसंपदा विभाग
१) सहाय्यक अभियंता, स्थापत्य गट ब, श्रेणी २ :- १०२ जागा
२) सहाय्यक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी २:- ४९ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) वनक्षेत्रपाल, (गट ब):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
२) महाराष्ट्र कृषी सेवा:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या अथवा त्याच विज्ञान शाखेतील समतुल्य पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी / विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी अथवा समतुल्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:-
१) वनक्षेत्रपाल, (गट ब):- २१ ते ३८ वर्षे
२) कृषी अधिकारी, गट-अ:- १८ ते ३८ वर्षे
३) कृषी अधिकारी, गट-ब:- १८ ते ३८ वर्षे
४) कृषी अधिकारी, कनिष्ठ, गट-ब:- १८ ते ३८ वर्षे
५) सहाय्यक अभियंता, स्थापत्य गट ब:- १९ ते ३८ वर्षे
६) सहाय्यक अभियंता, विद्युत व यांत्रिकी:- १९ ते ३८ वर्षे
( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- रु. ३९४/- ( मागासवर्गीय :- रु. २९४/-)
अर्ज करण्याची मुदत:- ०३ ऑक्टोबर २०२२ ते २३ ऑक्टोबर २०२२
चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत:- २८ ऑक्टोबर २०२२
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२२ । MPSC Technical Service Exam 2022

0 टिप्पण्या