भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (UPSC NDA & NA ) साठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती (UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2022)
एकूण जागा:- ४०० जागा
पदांचे विवरण:-
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी:- ३७० जागा
२) नौदल अकादमी:- ३० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( भारतीय लष्कर गटासाठी ) :- उमेदवार इयत्ता बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण असावा.
२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी वायुसेना गट व नौदल अकादमी :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून इयत्ता बारावी गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००३ ते ०१ जुलै २००६ दरम्यान झाला असावा.
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ सैन्यदलातील अधिकारी यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- ११ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजेपर्यंत
परीक्षा दिनांक:- १० एप्रिल २०२२
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र :- मुंबई, नागपुर, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या