
भारत सरकारच्या प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थेमध्ये (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research - SAMEER ) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज पाठवावेत.
जागांची संख्या:- ०७ जागा
जागांचे विवरण:-
१) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- ०५ जागा
२) वाहनचालक:- ०१ जागा
३) Multi Tasking Staff:- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच संगणक टंकलेखन वेग इंग्रजी ३५ श.प्र.मी. किंवा हिंदी ३० श.प्र.मी. असावा. उमेदवार पदवीधर व अनुभवधारक असल्यास प्राधान्य.
२) वाहनचालक:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा तसेच हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना असावा. उमेदवारास हलके वाहन चालविण्याचा ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
३) Multi Tasking Staff:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळामधून इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:- २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १००/- (अ.जा/ अ.ज/ दिव्यांग/ माजी सैनिक :- २५/- )
अर्ज करण्याची मुदत:- ०१ फेब्रुवारी २०२१ ते ०२ मार्च २०२१
विशेष सूचना:- उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
"Registrar,
Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER),
IIT Campus, Powai, Mumbai 400076"
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख:- १७ मार्च २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
0 टिप्पण्या