
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये १०+२ (B.TECH) प्रवेश अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव:- १०+२ (B.TECH) प्रवेश । 10+2 (B.TECH) CADET ENTRY SCHEME (PERMANENT COMMISSION)
जागांची संख्या:- २६ जागा
जागांचे विवरण:-
१) Education Branch:- ०५ जागा
२) Executive & Technical Branch:- २१ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार इयत्ता बारावी ( गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांमध्ये ७०% गुणांसह ) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार दहावी किंवा बारावी मध्ये इंग्रजी विषय ५०% सह उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराने JEE- मुख्य परीक्षा २०२० दिलेली असावी.(Call up for Service Selection Board (SSB) will be issued on the basis of JEE (Main) - 2020 All India Rank published by NTA.)
वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जुलै २००४ दरम्यान झालेला असावा.
परीक्षा शुल्क:- कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत:- २९ जानेवारी २०२१ ते ०९ फेब्रुवारी २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय नौसेनेमध्ये १०+२ (B.TECH) प्रवेश अंतर्गत भरती
INDIAN NAVY 10+2 (B.TECH) CADET ENTRY SCHEME 2021
0 टिप्पण्या