संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती (UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2021)

भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी साठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती (UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2021)
एकूण जागा:- ४०० जागा
पदांचे विवरण:-
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी:- ३७० जागा
२) नौदल अकादमी:- ३० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( भारतीय लष्कर गटासाठी ) :- उमेदवार इयत्ता बारावी कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण असावा.
२) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( वायुसेना गट व नौदल अकादमी ) :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून इयत्ता बारावी गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००२ ते ०१ जुलै २००५ दरम्यान झाला असावा.
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ सैन्यदलातील अधिकारी यांचे पाल्य यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- ३० डिसेंबर २०२० ते १९ जानेवारी २०२१ सायंकाळी ६ वाजेपर्यंत
परीक्षा दिनांक:- १८ एप्रिल २०२१
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल अकादमी भरती । UPSC NDA & NA (I) RECRUITMENT 2021
#getjob111 #nda #jobs #recruitment
0 टिप्पण्या