आण्विक ऊर्जा विभाग भरती । Department of Atomic Energy Recruitment 2020
भारत सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागात (Department of Atomic Energy) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ७४ जागा
पदांचे विवरण:-
१) लघुलेखक ( गट ब ):- ०२ जागा
२) लघुलेखक ( गट क ):- ०४ जागा
३) उच्च श्रेणी लिपिक ( गट क ):- ०५ जागा
४) कनिष्ठ खरेदी सहाय्यक ( गट क ):- ६३ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) लघुलेखक ( गट ब ):- उमेदवार इयत्ता दहावी ५०% सह उत्तीर्ण असावा.तसेच मान्यताप्राप्त संस्थेमधून इंग्रजी ८० श.प्र.मी. लघुलेखन व इंग्रजी ३० श.प्र.मी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) लघुलेखक ( गट क ):- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.तसेच मान्यताप्राप्त संस्थेमधून इंग्रजी १०० श.प्र.मी. लघुलेखन व इंग्रजी ४५ श.प्र.मी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) उच्च श्रेणी लिपिक ( गट क ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.तसेच मान्यताप्राप्त संस्थेमधून इंग्रजी ३० श.प्र.मी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
४) कनिष्ठ खरेदी सहाय्यक ( गट क ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखा किंवा वाणिज्य शाखेमधून ६०% सह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% सह पदविका (Mechanical Engineering/ Electrical Engineering/ Electronics/
Computer Science ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:- उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे. ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज./ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना कुठलेही परीक्षा शुल्क लागू नाही)
अर्ज करण्याची मुदत:- २८ नोव्हेंबर २०२० ते २७ डिसेंबर २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या