राष्ट्रीय परीक्षा बोर्ड मध्ये भरती । NATIONAL BOARD OF EXAMINATION RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा बोर्डामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- ९० जागा
पदांचे विवरण:-
१) वरिष्ठ सहाय्यक:- १८ जागा
२) कनिष्ठ सहाय्यक:- ५७ जागा
३) कनिष्ठ लेखापाल:- ०७ जागा
४) लघुटंकलेखक:- ०८ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) वरिष्ठ सहाय्यक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) कनिष्ठ सहाय्यक:- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
३) कनिष्ठ लेखापाल:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित किंवा सांख्यिकी अथवा वाणिज्य विषयातून पदवीधर असावा. तसेच उमेदवारास शासकीय कार्यालयातील संबंधित कामकाजाचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
४) लघुटंकलेखक:- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच लघुटंकलेखन परीक्षा ८० श.प्र. मी.उत्तीर्ण असावा.उमेदवारास संबंधित कामाचा दोन वर्षाचा आवश्यक आहे.
वय मर्यादा:- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १५००/- (अ.जा./ अ.ज./ इमाव [NCL]/ आर्थिक दृष्ट्या मागास/ महिला :- ७५०/- )
अर्ज करण्याची मुदत:- ११ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या