सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विशेष भरती । MAHARASHTRA PUBLIC WORKS DEPARTMENT, PUNE RECRUITMENT
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे कडून अनुसुचित जमातींच्या उमेदवारांसाठी गट क आणि ड मध्ये विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज पाठवावेत.
एकूण जागा:- १२ जागा
जागांचे विवरण:-
१) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- ०३ जागा
२) कनिष्ठ लिपिक:- ०२ जागा
३) आरेखक (श्रेणी-३):- ०२ जागा
४) शिपाई:- ०४ जागा
५) चौकीदार:- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक/ बांधकाम पर्यवेक्षक/ स्थापत्य आरेखक / स्थापत्य अभियांत्रिकी मधील उच्च शैक्षणिक अहर्ता धारण केली असावी. उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
२) कनिष्ठ लिपिक:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा. मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श.प्र.मी. टंकलेखन पात्रता धारण केलेली असावी. तसेच उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
३) आरेखक (श्रेणी-३):- उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा उत्तीर्ण असावा.उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
४) शिपाई:- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
५) चौकीदार:- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा:- १८ ते ४३ वर्षे
परीक्षा शुल्क:- १५०/- ( माजी सैनिकांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट खालील नावाने काढावा
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे
किंवा
Executive Engineer, Public Works Division, Pune
अर्ज पाठविण्याची मुदत:- २४ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
कार्यकारी अभियंता,
पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग,
मध्यवर्ती इमारती आवार,
पुणे - ४११ ००१

0 टिप्पण्या