भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये शेकडो जागांची भरती । LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA (LIC) RECRUITMENT
भारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
जागांची संख्या:- २१८ जागा
पदांचे विवरण:-
१) सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) AE (Civil):- २९ जागा
२) सहाय्यक अभियंता ( विद्युत )AE (Electrical):- १० जागा
३) सहाय्यक वास्तुविद्याविशारद ( Assistant Architect ):- ०४ जागा
४) सहाय्यक अभियंता( संरचना )AE (Structural) :- ०४ जागा
५) सहाय्यक अभियंता ( MEP अभियंता )AE (MEP Engineer):- ०३ जागा
६) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( सनदी लेखापाल )AAO (Chartered Accountant):- ४० जागा
७) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( विमागणितशास्त्र )AAO (Actuarial):- ३० जागा
८) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( कायदा )AAO (Legal):- ४० जागा
९) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( राजभाषा )AAO (Rajbhasha):- ०८ जागा
१०) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( माहिती व तंत्रज्ञान )AAO (IT):- ५० जागा
शैक्षणिक पात्रता:-
१) सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
२) सहाय्यक अभियंता ( विद्युत ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
३) सहाय्यक वास्तुविद्याविशारद:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्र पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
४) सहाय्यक अभियंता( संरचना ) :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संरचना अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
५) सहाय्यक अभियंता ( MEP अभियंता ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( विद्युत / यांत्रिकी) अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
६) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( सनदी लेखापाल ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक
७) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( विमागणितशास्त्र ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच इंस्टिट्यूट ऑफ ऍक्चुअरीज ऑफ इंडिया कडून घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
८) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( कायदा ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विधी पदवी किंवा LLM परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच तीन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक.
९) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( राजभाषा ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी तसेच हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
१०) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( माहिती व तंत्रज्ञान ):- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेकट्रोनिक्स विषयासह अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा, किंवा संगणक विज्ञान विषयासह MCA अथवा MSC परीक्षा उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- ७००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग :- ८५/- )
अर्ज करण्याची मुदत :- २५ फेब्रुवारी २०२० ते १५ मार्च २०२०
पूर्व परीक्षा दिनांक:- ०४ एप्रिल २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये शेकडो जागांची भरती । LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA (LIC) RECRUITMENT2020 #GETJOB111

0 टिप्पण्या