संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मध्ये हजारो पदांची महाभरती । DRDO CEPTAM MTS RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( DRDO ) मध्ये हजारो जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- MULTI TASKING STAFF
जागांची संख्या :- १८१७ जागा
जागांचे विवरण :-
१) अ.जा. :- १६३ जागा
२) अ.ज. :- ११४ जागा
३) इतर मागासवर्ग :- ५०३ जागा
४) आर्थिकदृष्ट्या मागास :- १८८ जागा
५) खुला :- ८४९ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून इयत्ता दहावी किंवा औद्योगिक प्रशिक्षण परीक्षा (ITI) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :- १८ ते २५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- १००/- ( महिला/ अ.जा. / अ.ज./ माजीसैनिक यांना कुठलेही शुल्क नाही.)
अर्ज करण्याची मुदत :- २३ डिसेंबर २०१९ (सकाळी १० वाजेपासून ) ते २३ जानेवारी २०२० ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या