प्रधान संचालनालय, संरक्षण संपदा,पुणे येथे अधिकारी पदाची भरती | Defense Estate, Pune Recruitment 2019
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रधान संचालनालय, संरक्षण संपदा, पुणे येथे अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून पाठवावेत.
पदाचे नाव :- उपविभागीय अधिकारी श्रेणी-II ( गट-क)
पदांची संख्या :- १३ जागा
पदांचे विवरण :-
१) अनुसूचित जमाती :- ०२ जागा
२) इतर मागासवर्ग :- ०५ जागा
३)आर्थिक दृष्ट्या मागास :- ०२ जागा
४) खुला :- ०४ जागा
वरील पदांपैकी ०३ जागा माजी सैनिक व ०२ जागा दिव्यांग यांच्यासाठी राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराने दोन वर्षाचा सर्वेयिंग किंवा ड्राफ्टमनशिप मधील पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असावा.
वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.ज/महिला/दिव्यांग/माजीसैनिक/आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग यांना कुठलेही शुल्क नाही)
डिमांड ड्राफ्ट " PRINCIPAL DIRECTORATE DEFENCE ESTATES SOUTHERN COMMAND PUNE" यांचे नावे देय असावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
“Principal Director,
Defence Estates,
Southern Command, Near ECHS Polyclinic,
Kondhwa Road, Pune
(Maharashtra)-411040”
अर्ज करण्याची मुदत :- २० ऑक्टोंबर २०१९ पर्यंत
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या