मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती २०१८
भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- २४ जागा
पदांचे विवरण :-
१) सहाय्यक सचिव ( गट अ ) :- ०२ जागा
२) लेख अधिकारी ( गट अ ) :- ०४ जागा
३) सहाय्यक कार्यकारी अभियंता :- ०३ जागा
४) सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक ( गट अ ):- ०४ जागा
५) सहाय्यक व्यवस्थापक( गट अ ) :- ०३ जागा
६) सहाय्यक कार्यकारी अभियंता (दूरसंचार ):- ०१ जागा
७)सहाय्यक सामग्री व्यवस्थापक ( गट अ ) :- ०१ जागा
८) विधी अधिकारी :- ०१ जागा
९) सहाय्यक कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) :- ०३ जागा
१०) सहाय्यक सुरक्षा अधिकारी :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) सहाय्यक सचिव ( गट अ ) :- पदवी
२) लेखा अधिकारी ( गट अ ) :- भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असणे आवश्यक
३) सहाय्यक कार्यकारी अभियंता :- विद्युत / इलेक्ट्रोनिक्स आणि दळवळण अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
४) सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक ( गट अ ):-पदवी उत्तीर्ण
५) सहाय्यक व्यवस्थापक( गट अ ) :- संबंधित पदव्युत्तर पदवी
६) सहाय्यक कार्यकारी अभियंता (दूरसंचार ):- विद्युत/ दूरसंचार/ इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
७)सहाय्यक सामग्री व्यवस्थापक ( गट अ ) :- यांत्रिक किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
८) विधी अधिकारी :- विधी शाखेतील पदवी उत्तीर्ण
९) सहाय्यक कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
१०) सहाय्यक सुरक्षा अधिकारी :- पदवी उत्तीर्ण
अनुभव :- सर्व पदांसाठी अनुभव असल्यास प्राधान्य
वय मर्यादा :- १८ ते ३० ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग/ मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी :- १००/-)
अर्ज करण्याची मुदत :- ०९/०६/२०१७ ते ०७/०७/२०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या