भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती २०१८
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था च्या नागपुर येथील आयुर्विज्ञान संस्थेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ३० जागा
पदांचे विवरण :-
१) वैयक्तिक सहाय्यक :- ०१ जागा
२) ग्रंथपाल गट III :- ०१ जागा
३) तांत्रिक सहाय्यक :- ०१ जागा
४) भांडार व्यवस्थापक :- ०२ जागा
५) वसतिगृह अधीक्षक :- ०२ जागा
६) रोखपाल :- ०१ जागा
७) वरिष्ठ लिपिक :- ०४ जागा
८) ग्रंथालय मदतनीस :- ०१ जागा
९) प्रयोगशाळा तांत्रिक :- ०८ जागा
१०) प्रयोगशाळा मदतनीस :- ०८ जागा
११) लघुलेखक :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) वैयक्तिक सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण तसेच टंकलेखन प्रभुत्व असणे गरजेचे
२) ग्रंथपाल गट III :- ग्रंथाविज्ञान पदवी किंवा समतुल्य पदवी , दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
३) तांत्रिक सहाय्यक :- संबंधित पदवी किंवा समतुल्य पदविका तसेच अनुभव
४) भांडार व्यवस्थापक :- पदवी
५) वसतिगृह अधीक्षक :- पदवी , पदविका तसेच अनुभव आवश्यक
६) रोखपाल :- वाणिज्य शाखेतील पदवी , दोन वर्षाचा अनुभव व संगणक प्रभुत्व असणे गरजेचे
७) वरिष्ठ लिपिक :- पदवी उत्तीर्ण तसेच टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण व संगणक प्रभुत्व आवश्यक
८) ग्रंथालय मदतनीस :- ग्रंथालय विज्ञान पदविका उत्तीर्ण तसेच संगणक हाताळता येणे गरजेचे
९) प्रयोगशाळा तांत्रिक :- १२ वी , प्रयोगशाळा तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
१०) प्रयोगशाळा मदतनीस :- १२ वी , प्रयोगशाळा तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण तसेच दोन वर्षाचा अनुभव
११) लघुलेखक :- १२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी ५० शब्द किंवा हिंदी ६५ शब्द टंकलेखन वेग असणे गरजेचे
वयमर्यादा :- १८ ते ४५ ( पदानुसार वेगवेगळी )
अर्ज करण्याची मुदत :- १९/०५/२०१८ ते १८/०६/२०१८ ( ५ वाजेपर्यंत )
परीक्षा शुल्क :- १०००/- ( अ.जा./अ.ज./महिला/दिव्यांग कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्यासाठी
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

0 टिप्पण्या