भारतीय मानक ब्युरो मध्ये वैज्ञानिक पदाची भरती | BUREAU OF INDIAN STANDARDS (B I S) SCIENTISTS RECRUITMENT 2020
भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो BUREAU OF INDIAN STANDARDS (B I S) मध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करावे.
पदाचे नाव:- वैज्ञानिक / Scientist-‘B’
जागांची संख्या:- १५०
जागांचे विवरण:-
१) यांत्रिकी अभियांत्रिकी:- ४८ जागा
२) मेटालर्जिकल अभियांत्रिकी:- २५ जागा
३) स्थापत्य अभियांत्रिकी:- ०७ जागा
४) विद्युत अभियांत्रिकी:- १९ जागा
५) इलेकट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी:- ०५ जागा
६) संगणकीय अभियांत्रिकी:- ११ जागा
७) अन्न तंत्रज्ञान:- १४ जागा
८) रासायनिक अभियांत्रिकी:- १६ जागा
९) जैव तंत्रज्ञान:- ०१ जागा
१०) पेट्रो-केमिकल अभियांत्रिकी:- ०१ जागा
११) जैव-वैद्यकीय अभियांत्रिकी:- ०३ जागा
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. तसेच अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा GATE (Graduate Aptitude Test in Engineering) उत्तीर्ण असावा.
वयमर्यादा:- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
परीक्षा शुल्क:- १००/- ( अ.जा./ अ.ज./महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक/भारतीय मानक ब्युरो कर्मचारी यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत:- ०२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२०
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या