स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भरती २०१९
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत पाठवावेत. तसेच खालील सर्व पदे कंत्राटी तत्वावर आहेत.
पदांची संख्या :- २८ जागा
पदांचे विवरण :-
१) समन्वयक :- ०१ जागा
२) अधीक्षक ( मुलांचे वसतीगृह ) :- ०१ जागा
३) अधीक्षिका ( मुलींचे वसतीगृह ) :- ०१ जागा
४) असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल :- ०१ जागा
५) प्रयोगशाळा सहाय्यक :- ०७ जागा
६) प्रयोगशाळा सहाय्यक ( संगणक ) :- ०४ जागा
७) फार्मासिस्ट :- ०१ जागा
८) फार्मासिस्ट / तंत्रज्ञ :- ०१ जागा
९) टेक्निशियन / प्रयोगशाळा सहाय्यक :- ०२ जागा
१०) कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक :- ०१ जागा
११) अंगरक्षक :- ०१ जागा
१२) वाहन चालक :- ०२ जागा
१३) प्रयोगशाळा परिचर:- ०४ जागा
१४) परिचारिका :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) समन्वयक :- ५५% सहा पदव्युत्तर पदवी
२) अधीक्षक ( मुलांचे वसतीगृह ) :- पदव्युत्तर पदवी, मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श.प्र.मी.टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास तसेच संबंधित पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक
३) अधीक्षिका ( मुलींचे वसतीगृह ) :- पदव्युत्तर पदवी, मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श.प्र.मी.टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास तसेच संबंधित पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक
४) असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल :- संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
५) प्रयोगशाळा सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा D. Farm तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे . अनुभव असल्यास प्राधान्य
६) प्रयोगशाळा सहाय्यक ( संगणक ) :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा B.C.A किंवा संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदविका तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे . अनुभव असल्यास प्राधान्य
७) फार्मासिस्ट :- उमेदवार B.Sc Chemistry उत्तीर्ण असावा. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
८) फार्मासिस्ट / तंत्रज्ञ :- उमेदवार D.Pharm. / B.Pharm. उत्तीर्ण असावा. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
९) टेक्निशियन / प्रयोगशाळा सहाय्यक :- संबंधित क्षेत्रातील पदविका, अनुभव असल्यास प्राधान्य
१०) कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालयशास्त्रातील पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे . अनुभव असल्यास प्राधान्य
११) अंगरक्षक :- सैन्यदल किंवा पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्याचा ०५ वर्षाचा अनुभव
१२) वाहन चालक :- उमेदवार ७ वी उत्तीर्ण असावा, हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहन चालविण्याचा ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
१३) प्रयोगशाळा परिचर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची बारावी (विज्ञान शाखा ) परीक्षा उत्तीर्ण
१४) परिचारिका :- परिचारिका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
कुलसचिव कार्यालय ( आवक कक्ष )
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
विष्णुपुरी,नांदेड - ४३१ ६०६
अर्ज करण्याची मुदत :- ०३ जुलै २०१९ ते १३ जुलै २०१९
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या